“ठाकरे महाराष्ट्रातले नाहीत, मगध येथून आले..”; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य
महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा पहिलीपासून सुरु करण्याच्या निर्णयाला राज आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरेंवर टीका करत म्हटलं की, मराठीची ओळख कानशिलात लगावणारी भाषा म्हणून करायची नाही. राज आणि उद्धव यांची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे त्यांची युती यशस्वी होणार नाही. हिंदी राजभाषा असूनही, मराठी अस्मिता महत्त्वाची आहे.