देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “ठाकरे बंधूंनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं आम्हाला…”
महाराष्ट्रात हिंदी भाषा लागू करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ एप्रिल आणि १७ जूनचे अध्यादेश रद्द केले. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून निर्णय घेतल्याची टीका झाली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. तसेच, रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित असल्याची माहिती दिली.