देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “माझं उद्धव ठाकरेंना एवढंच सांगणं आहे…”
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का केली जाते आहे, यावरून वाद सुरू आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी किंवा इतर भाषा शिकण्याचा पर्याय दिला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी याला विरोध दर्शवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती नसून मराठी सक्ती असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी हिंदीची सक्ती खपवून घेणार नसल्याचे म्हटले. फडणवीस यांनी राहुल गांधींनाही टोला लगावला.