“माणिकराव जंगली रमी खेळत होते..”, जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केले आणखी दोन व्हिडीओ
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जंगली रमी खेळण्याच्या वादावर जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. कोकाटे यांनी व्हिडीओ जाहिरात स्कीप करत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आव्हाड यांनी कोकाटे जंगली रमी खेळत असल्याचे आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसंच हवे तेवढे पुरावे देऊ असंही म्हटलं आहे.