मनिषा कायंदेचा सभागृहात गंभीर आरोप; “पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरले आहेत, त्यांनी…”
पंढरपूरची वारी जगप्रसिद्ध असून लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी वारीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत सबळ पुरावे असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरेंनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत, अशा लोकांकडे लक्ष देऊ नका असे म्हटले आहे. वारीचा गैरफायदा घेऊ नये, असा कायंदे यांचा उद्देश आहे.