Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांना दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलकांनी जल्लोष केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विजयाची घोषणा केली.