नितीन गडकरींचं वक्तव्य; “मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही हे…”
राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादळ असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये हलबा महासंघाच्या कार्यक्रमात वक्तव्य केले. त्यांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्याबद्दल परमेश्वराचे उपकार मानले. गडकरी म्हणाले की, बेरोजगारी ही मोठी समस्या आहे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची गरज आहे. गुणवत्तेचा विकास महत्त्वाचा असून, समाजातील सुशिक्षितांनी पुढाकार घ्यावा.