राज ठाकरेंचा गंभीर आरोप; “महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार भरण्यात आले आहेत, मुंबईत…”
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात मनसेचा मेळावा झाला. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका करत ९६ लाख खोटे मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप केला. त्यांनी निवडणुका कशा प्रकारे चालवल्या जातात यावर प्रश्न उपस्थित केले. तसेच, नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर शंका उपस्थित केली.