पुरुषाचा वेश घेऊन बहिणीचे दीड कोटींचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, वसई पोलिसांची कारवाई
वसई पोलिसांनी २७ वर्षीय ज्योती भानुशालीला दीड कोटींचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. ज्योतीने पुरुषाच्या वेशात बहिणीच्या घरी चोरी केली. ११ ऑगस्ट रोजी वसई पश्चिमेच्या शास्त्री नगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिला नवसारी, गुजरात येथून अटक केली आणि चोरीचे दागिने जप्त केले. ज्योतीला शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी चोरी केली होती.