“आपल्या टीमला पाकिस्तानविरोधात मॅच खेळायची नाही, पण..”, संजय राऊतांचं मोठं विधान
शिवसेना (ठाकरे) पक्षाने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळणे योग्य नाही, असे सांगून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. संजय राऊत यांनी बीसीसीआय, भाजपा आणि जय शाह यांच्यावर टीका केली. भारतीय क्रिकेट संघालाही सामना खेळायचा नाही, परंतु दबावामुळे खेळत असल्याचा दावा त्यांनी केला.