“मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोल”, थेट राज ठाकरेंनाच दिलं व्यावसायिकानं आव्हान!
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद सुरू आहे. राज्य सरकारने मराठी भाषा शिकण्याचा आदेश दिला होता, परंतु विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो रद्द केला. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सुशील केडियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. केडियांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मराठी शिकणार नसल्याचं जाहीर केलं आहे, ज्यामुळे ती पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.