आता केमिस्टकडून खोकल्यावरील औषध घेता येणार नाही, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 'कोल्ड्रीफ' कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय लहान मुलांच्या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. FDA ने कफ सिरपच्या दर्जाची तपासणी, भेसळयुक्त औषधसाठा परत मागवणे, आणि औषध उत्पादकांच्या तपासण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.