२६.३४ लाख लाडक्या बहिणींना जूनपासूनचे पैसे येणे बंद होणार, कारण काय?
महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय झाली. मासिक १५०० रुपये मिळत असल्याने अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतला. यात १४,२९८ पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. तसेच आता २६.३४ लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा लाभ स्थगित करण्यात आला आहे.