तीन राज्यांना वाँटेड असलेला ओंकार सिंधुदुर्गच्या जंगलांत
सावंतवाडी: कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून आलेल्या हत्तींच्या कळपाने महाराष्ट्र आणि गोवा सीमेलगत शेती व्यवसाय संकटात आणला आहे. ओंकार नावाचा १०-१२ वर्षांचा हत्ती सिंधुदुर्गात वृद्धाला चिरडल्यानंतर गोव्यात शेतांचे नुकसान करून तो पुन्हा महाराष्ट्रात परतला आहे. त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांनी योजना आखली आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.