“फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जालन्याहून मुंबईकडे निघाले आहेत आणि २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तर मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी काही अटी ठेवल्या आहेत. मनोज जरांगे यांनी सर्व नियम पाळण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु एका दिवसाचे आंदोलन करण्याबाबत त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.