लाडक्या बहिणींनो बँक खातं तपासा, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झाला आहे. अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.