ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून नारायण राणेंचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “युती…”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विचारले की, युती करताना ताकद पाहिली जाते का? भाजपाचे १३४ आमदार, अजित पवारांचे ४१, शिंदे यांचे ५२ आमदार आहेत. मग ठाकरे यांना काय फायदा होणार? त्यांनी दोन्ही ठाकरे भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला आणि उद्धव यांनी भाजपाविरोधात बोलू नये असेही सांगितले.