“…म्हणून तिथे गेले होते”, सुनेत्रा पवारांचं RSS च्या बैठकीबाबत स्पष्टीकरण; “बारामतीमध्ये…”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांचा आरएसएसच्या बैठकीतील फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला. रोहित पवार यांनी यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण देत, या उपस्थितीमागे कोणताही राजकीय उद्देश नसल्याचे सांगितले. त्यांनी विविध महिला संघटनांच्या कामाची ओळख करून घेण्यासाठी या बैठकीत सहभाग घेतल्याचे स्पष्ट केले.