पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, पुरावे दाखवत दमानियांची आगपाखड; म्हणाल्या, “ही फुकट…”
पार्थ पवार पुणे जमीन घोटाळा: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. स्टँप ड्युटी चुकवण्यासाठी मोठ्या जमीन व्यवहाराचे मूल्य कमी दाखवण्यात आल्याचा दावा आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरावे सादर करत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पार्थ पवारांच्या कंपनीच्या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.