“गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरूनच…”, नाराजीनाट्यानंतर प्रकाश महाजन यांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन पक्षाच्या राज्यव्यापी शिबिराला निमंत्रित न केल्यामुळे नाराज होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. अमित ठाकरे यांनी त्यांना फोन करून त्यांची मनधरणी केली. महाजन यांनी पक्षात ज्येष्ठांना मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. नारायण राणे प्रकरणात पक्षाने साथ दिली नसल्याची खंतही त्यांनी मांडली.