उद्धव ठाकरेंशी युतीबाबत काय म्हणाले राज ठाकरे? मराठीच्या मुद्द्यावर बोलताना केले सूतोवाच!
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हिंदी शिकवण्याच्या त्रिभाषा सूत्राला विरोध म्हणून ५ जुलैला मोर्चा काढण्याचे ठरले होते, पण सरकारने अध्यादेश रद्द केल्यामुळे मोर्चा रद्द झाला. मात्र, विजयी मेळावा होणार आहे. राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणताही निर्णय जाहीर न करता, हिंदीसंदर्भातील मुद्द्याला राजकीय लेबल न लावण्याचे आवाहन केले.