राज ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य, “मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो…”
महाराष्ट्रात १५ ऑगस्टच्या मांस विक्री बंदीवरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रभादेवी दहीकाला उत्सवाच्या निमंत्रणावर "मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो" असे मिष्किल वक्तव्य केले. त्यांनी महापालिकेच्या निर्णयावर टीका करताना स्वातंत्र्यदिनी लोकांचे स्वातंत्र्य हिरावले जात असल्याचे म्हटले. "कुणी काय खावे हे सरकार आणि महापालिकेने ठरवू नये," असेही त्यांनी स्पष्ट केले.