पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टीप्रकरणी अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी आयोजित केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर रोहिणी खडसेंनी पतीची पाठराखण करत कायद्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पुण्याजवळच्या खराडी भागात झालेल्या पार्टीत दारू, गांजा व हुक्का आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.