डोनाल्ड ट्रम्प ते ऑपरेशन सिंदूर! सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे…
मोहन भागवत यांनी गेल्या दीड वर्षांत देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडल्याची बाब नमूद केली. या घडामोडींमुळे श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ अशा भारताच्या शेजारी देशांमध्ये आंदोलन व त्याअनुषंगाने अराजक निर्माण झाल्याचं ते म्हणाले. पहलगामनंतर जगातल्या वेगवेगळ्या देशांनी घेतलेल्या भूमिकेतून आपले मित्र कोण आहेत हे आपल्याला समजलं.