शिंदे अन् पवारांच्या हस्ते ‘समृद्धी’चं उद्घाटन, फडणवीसांच्या हाती कापलेली फित
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले होते. उद्घाटनावेळी फित कापताना मुख्यमंत्र्यांच्या हाती आधीच कापलेली फित आली. त्यांनी तीच फित पुन्हा कापली. या प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.