‘अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त’, संजय राऊतांची जहाल टीका
शिवसेना (ठाकरे) पक्षाने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळण्यावर विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांनी या सामन्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावे असे विधान केले होते, ज्यावर राऊत यांनी संताप व्यक्त केला आणि पवारांवर गंभीर आरोप केले.