गिरीश महाजनांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले, “ते डरपोक…”
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडणार असल्याचं म्हटलं. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी महाजन यांना डरपोक आणि भ्रष्ट दलाल म्हणत टीका केली. राऊत म्हणाले की, शिवसेना पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे आणि कोणालाही शिवसेना संपवणं शक्य नाही.