शरद पवारांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत भूमिका; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या …”
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त असल्याचे पवारांनी नमूद केले. तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चाही जोरात सुरू आहेत.