“अशी अतिवृष्टी पूर्वी कधीही पाहिली नाही”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, ‘या’ दोन गोष्टी तातडीने…
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. शरद पवार यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती केली आहे. सोयाबीनसह इतर पिकं कुजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती योजनेचा लाभ घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.