“कुणीही सांगतो…”, राज ठाकरेंच्या आवाहनावर शरद पवारांची भूमिका; हिंदी सक्तीबाबत मांडलं मत!
महाराष्ट्रात हिंदी भाषा अनिवार्य असावी की ऐच्छिक, यावर मोठा वाद सुरू आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला, पण विरोधानंतर बदल केले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. शरद पवारांनी पहिली ते चौथी हिंदी सक्ती योग्य नसल्याचं मत मांडलं. पाचवीनंतर हिंदी आवश्यक आहे, पण लहान वयात मातृभाषा महत्त्वाची आहे, असं त्यांनी सांगितलं.