युती होण्याआधी मनोमिलन सुरू; आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडे समोरासमोरा येताच…
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा आहे. ५ जुलै रोजी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले. दरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात समोरासमोर आले असताना त्यांनी हस्तांदोलन केले.