‘भाजपाने लायकीत राहावे’, बाळासाहेब-मियाँदाद भेटीच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
यूएईमधील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. यावरून शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबाबतच्या आरोपाला उत्तर देताना, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला.