“कमलताई गवई RSS च्या जाळ्यात फसल्या नाहीत, पण चंद्रचूड…”, संजय राऊत यांचं मोठं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती येथील विजयादशमी सोहळ्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित केले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आणि माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना टोला लगावला.