“हे तर फडणवीसांना बदनाम…”, आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला. ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी आणि सरकारचा कारभार स्वच्छ असल्याचे दाखवावे, असे आवाहन केले.