कोकणातली राजकीय गणितं बदलणार? राजन तेली शिंदे गटात; ठाकरेंना सोडण्याचं दिलं ‘हे’ कारण!
कधीकाळी कट्टर शिवसैनिक असणारे कोकणातील नेते राजन तेली भाजप, ठाकरे गट असा प्रवास करत शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटात काम करण्याची संधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. तेलींच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही ठाकरेंवर टीका टाळली आहे. आता ते शिवसेनेत कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.