“६३ कोटींचा दसरा मेळावा, उबाठासाठी ९ अंक लाभदायक असल्यामुळे…”, भाजपाचा मोठा दावा
शिवसेनेचा (उबाठा) दसरा मेळावा यंदाही मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दावा केला आहे की या मेळाव्याचे बजेट ६३ कोटी रुपये आहे. त्यांनी म्हटले की उद्धव ठाकरे नऊ अंकावर अवलंबून असतात, म्हणूनच हे बजेट ६३ कोटी ठेवले आहे. उपाध्ये म्हणाले हे पैसे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वापरले असते तर अधिक उपयुक्त ठरले असते.