राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर स्मिता ठाकरेंचं भाष्य, “बाळासाहेब हयात असताना…”
५ जुलैला वरळीतील विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या असून, दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्मिता ठाकरे यांनी दोघांच्या एकत्र येण्याचं स्वागत केलं, पण बाळासाहेबांच्या काळात हे घडलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं मत व्यक्त केलं. आगामी निवडणुकांसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा आहे.