‘राज आणि उद्धव ठाकरेंची युती कायमची की आंदोलनापुरती?’ अनिल परब आणि नांदगावकरांचं उत्तर..
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोघेही हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, परंतु अंतिम निर्णय राज आणि उद्धव ठाकरे घेतील. मागील १९ वर्षांच्या मतभेदांनंतर हे दोघे एकत्र येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.