‘सत्ताधारी बाकावर या’ मुख्यमंत्री फडणवीसांच्या या ऑफरवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला उत्तर देताना त्यांनी शिंदेंवर टीका केली.