Ind vs Pak Asia Cup Match: “जावेद मियाँदाद जेव्हा घरी आला, तेव्हा बाळासाहेबांनी…”, भारत-पाक सामन्याला ठाकरे गटाचा तीव्र विरोध!
आशिया कप स्पर्धेत भारताने यूएईविरुद्ध विजय मिळवून अ गटात आघाडी घेतली आहे. १४ सप्टेंबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, ज्याला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा दाखला देत सामना रद्द करण्याची मागणी केली. १४ सप्टेंबरला 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन होणार असून, महिलांनी नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवण्याचे आवाहन केले आहे.