Video: ‘अशी’ केली जाते दूध भेसळ, पाहा काय मिसळलं जातंय रोजच्या दुधात!
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनाबाहेर दूध भेसळीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी दूध पावडर, केमिकल, पाणी आणि स्वयंपाकाचे तेल वापरून भेसळ कशी होते हे सादर केले. भेसळीतून २५० मिली दुधाचे १ लिटर दूध तयार होते. त्यांनी भेसळ थांबवण्याची मागणी केली, कारण यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही.