अजित पवारांना भिडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत?
सोलापूर जिल्ह्यातील एका गावात उत्खननाविरोधात कारवाई करत असताना आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दुसऱ्याच्या फोनवरून बोलण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंजना कृष्णा २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी असून केरळच्या तिरुवनंतपुरम येथील आहेत.