पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही? अजित पवार यांनी सांगितले खरे कारण…
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, कोरेगाव पार्क प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? याचे कारण अजित पवार यांनी सांगितले.