काका-पुतण्यांच्या गाठीभेटी वाढल्या, दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? अजित पवार म्हणाले…
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यास सहमती दर्शवल्यानंतर पवार काका-पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात AI वापराबाबत पुण्यात बैठक घेतली. अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देत म्हटलं की, परिवारातील कार्यक्रमांसाठी एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. जनतेच्या हितासाठी अशा बैठका आवश्यक आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचारांची देवाणघेवाण महत्त्वाची आहे.