दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना धमकीचा मेल; घरी बॉम्ब ठेवल्याचा दावा; सुरक्षेत वाढ
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील घराला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. सोमवारी सकाळी पोलिसांना ई-मेलद्वारे ही माहिती मिळाली. पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले, परंतु तपासणीत काहीच सापडले नाही. ई-मेल खोटे असल्याचे स्पष्ट झाले. सध्या सायबर क्राइम सेल तपास करत आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार आहे.