लग्न न करता चाळिशीत आई होणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; एकल पालकत्वबद्दल म्हणाली…
दाक्षिणात्य अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना भावना रामण्णा सध्या चर्चेत आहे कारण तिनं वयाच्या चाळिशीत आई होण्याचा निर्णय घेतला आहे. अविवाहित असूनही तिनं आयव्हीएफच्या माध्यमातून मातृत्व स्वीकारलं आहे. भावना सहा महिन्यांची गरोदर असून, दोन जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. तिनं एकल पालकत्वाची तयारी केली आहे आणि मुलांना प्रेम, जबाबदारी, सत्य शिकवणार आहे.