Jolly LLB 3 चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स
जॉली एलएलबी ३ चित्रपटाच्या टीझरवर पुण्यातील वकील वाजीद खान आणि गणेश म्हस्के यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी टीझरमधून न्यायाधीश आणि वकिलांची प्रतिमा मलिन केल्याचा दावा करत पुणे न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने अभिनेते अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना समन्स बजावले असून २८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.