“…तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही”, राणी मुखर्जीचं वक्तव्य; अभिनेत्री असं का म्हणाली?
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी २०२५ चा सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ३० वर्षांच्या कारकिर्दीतला हा तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. राणीने ANI पॉडकास्टमध्ये सांगितलं की, हा पुरस्कार तिच्यासाठी खूप खास आहे. शाहरुख खानलाही 'जवान' चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राणीने कलाकारांसाठी पुरस्काराचं महत्त्वही अधोरेखित केलं.