रजनीकांत यांचा ‘कुली’ चित्रपट कसा आहे? लोकप्रिय अभिनेत्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी हा चित्रपट पाहून रजनीकांत यांचे कौतुक केले आणि त्यांच्या ५० वर्षांच्या फिल्म इंडस्ट्रीतील योगदानाबद्दल अभिनंदन केले. उदयनिधी यांनी 'कुली' चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असे म्हटले. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत असून, ह्रतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांच्या 'वॉर २' सोबत बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार आहे.