“दुसऱ्या महिन्यातच त्याला पकडलं…”, युजवेंद्र चहलने केलेली फसवणूक? धनश्री वर्माचा खुलासा
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा ४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर यावर्षी घटस्फोट झाला. 'Rise And Fall' शोमध्ये सहभागी झालेली धनश्री, चहलबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाली की, तिला नात्यात फसवणूक झाली होती. तिने पोटगीबाबत कोणतीही मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं. धनश्रीने सांगितलं की, घटस्फोट लवकर झाला कारण दोघांनाही घटस्फोट हवा होता.